logo

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वव्यापी नेते - प्रा अमोलकुमार वाघमारे,

महामानव भारतरत्न प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वव्यापी नेते होते त्यांनी विद्यार्थी, महिला, दलित ,आदिवासी, कामगार, युवा,वयोवृद्ध या सर्वांचा विचार करून सर्वांना समान न्याय देण्याचं काम घटनेच्या माध्यमातून संविधानाची निर्मिती करून केलं असे प्रतिपादन शाहू महाराज विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा अमोलकुमार वाघमारे यांनी केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी शिवम हाईट सोसायटी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी वानखेडे साहेब होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले त्रिशरण व पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक दुर्गेश शिरसाट यांनी केले सोसायटीतील लहान चिमुकले प्रबुद्ध चव्हाण, परी सरडे, तुषा जाधव ,तस्वी शिरसाट यांनी मनोगत व जीगीषा राऊत हिने 'माझ्या भिमाच्या नावाचे कुंकू लाविले रमाने' व 'नांदण नांदण होतं रमाच नांदण' ही गीत गायन करून बाबासाहेबांना अनोखी श्रद्धांजली वाहिली यानंतर 'कायदा भिमाचा' व 'भीमाने माय सोन्याने भरली ओटी' हे गीत गायन करून रश्मी राऊत यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याचबरोबर सदानंद वाघमारे सर यांनी 'वो बात करो पैदा हम भीम दिवानो मै' ही बाबासाहेबांवर कवाली सादर केली यानंतर व्याख्याते प्रा अमोलकुमार वाघमारे यांनी 'छाती ठोक हे सांगू जगाला' हे गीत सादर करून वातावरण आणखीनच प्रसन्न केले आणि तदनंतर त्यांनी व्याख्यानास सुरुवात केली कायदामंत्री, ऊर्जामंत्री, कामगार मंत्री म्हणून संविधानाची निर्मिती करताना सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका बाबासाहेबांनी घेतली बाबासाहेब हे जलतज्ञ, कृषीतज्ञ, विधीतज्ञ, कामगार कायदे तज्ञ होते त्यांच्याकडे असणारी दूरदृष्टी व कल्पकता वापरून महिला व कामगारांसाठी भरीव अशा पद्धतीची तरतूद त्यांनी संविधानात केली हे विसरून चालणार नाही पगार, बोनस, कामाचे तास, महिलांना भर पगारी मिळणारी प्रसूती रजा हे सगळं बाबासाहेबांचे देण आहे त्यांच्या ऋणातून आपल्याला अजिबात मुक्त होता येणार नाही आणि हे केवळ मागासवर्गीय आदिवासींसाठी नाही तर भारतात जन्मलेल्या प्रत्येक नागरिक पुरुष आणि महिले साठी आहे याची जाणिव आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे असं आपल्या मनोगत मधून प्रा अमोलकुमार वाघमारे यांनी ठणकावून सांगितले अध्यक्षिय भाषणामध्ये संपूर्ण जयंती कार्यक्रमाचा आढावा घेताना लहान मुलांनी सादर केलेली भाषणे व गीते ऐकून खूप आनंद झाला मन प्रसन्न झालं लहान वयात त्यांना बाबासाहेबांच्या बद्दल एवढी माहिती आहे हे ऐकून समाधान वाटलं त्याचबरोबर बाबासाहेबांच्या वरचे गीत व व्याख्यानांमधून समाज प्रबोधनाचा वारसा हा अखंड चालू राहिला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे सामाजिक भान प्रत्येकाला असणं ही काळाची गरज आहे असं मनोगत वानखेडे साहेब यांनी केले शेवटी आभार सोनवणे साहेब यांनी मानले कार्यक्रमाचे संयोजन जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष झनके साहेब नांगरे साहेब पेडणेकर साहेब यांनी केले कार्यक्रमानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाचा आयोजन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आलेलं होतं कार्यक्रमास सोसायटीतील सर्व महिला, पुरुष, बालचमू ,अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते

25
2101 views